Monday 17 December 2012

"मल्हारगड , पुरंदर " दुर्गसंवर्धन मोहिम तयारी.


||जय आई भवानी , जय शिवराय ||

येत्या २२ तारखेला श्री शिवस्वराज्य सेवा संघ विन्सीस ह्या कंपनीमार्फत चालवल्या जाणार्या मल्हारगड दुर्गसंवर्धनास मदतीला सुरुवात करत आहे , आपल्यालाही मदत करायची इच्छा असेल तर संपर्क करावा.

दिनांक १५ डिसेंबर रोजी श्री शिवस्वराज्य सेवा संघ आपली उद्धीष्ठे व ध्येय सांगण्यास "राष्ट्रीय सेवा योजना, मोडर्न महाविद्यालय पुणे" यांच्या विषेश शिबीरात गेला होता . ह्यासाठी श्री. सप्रभाकर वराडे यांचे कोटी कोटी धन्यवाद. किल्ले संवर्धन काय आहे ? ते करणे का गरजेचे आहे , त्यात तरुणांनी सामिल होऊन शिवरायांच्या उपकारांची जाणिव असल्याचे दाखवुन द्या ! असे मुद्दे सुजित नवले ह्यांनी मांडले.
काय म्हणतील राजे जेव्हा पाहतील ज्या किल्लांवर वर्चस्व साधत त्यानी,
करोडो मंदिरे मुघलांपासुन वाचवत धर्मध्वज ग‍गली छाताड वर करुन फडकवला,
लाखो घरांतील आयाबहिणींची अब्रु सैतानी कुत्र्यांकडुन वाचवली,
दिल्लीमधल्या परकिय लुटार्यांची पळता भुई केली ,

आज ते किल्ले ओसाड पडले आहेत , फक्त पार्टांसाठी 
तरुणाई येथे भेट देत आहे
भिंती ज्या साक्ष देतात शिवरायांची ,  कोसाळत आहेत ,बदामांनी भरत आहेत.

ह्या वेळी आपणच उभे राहिले पाहिजे किल्यांसाठी , हिच वेळ आहे !

कार्यक्रमातील काही छायाचित्रे-

सुजित नवले , येत्या कार्यक्रमाची व दुर्गसंवर्धनाची माहिती देताना.


शुभम भेगडे , भारतीय संस्क्रुती चा संदर्भ देताना.


आमच्या सादरीकरणामुळे मुलांचे जेवण लांबले गेले , तरीही घोषणांमध्ये सिंह‍ही घाबरेल हि ताकद होती.
सर्व शिक्षकांचे अधिक धन्यवाद.



आम्हाला राष्ट्रीय सेवा योजानेचय्या प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकांकडुन पाहुणचाराचा ध‍डा मिळाला.


विशेष धन्यवाद - राष्ट्रीय सेवा योजना , मोडर्न महाविद्यालय, पुणे.