Monday 29 July 2013

दु्र्ग संवर्धनातील एक टप्पा.


||श्री||



श्री शिवस्वराज्य सेवा संघ आणि मॉडर्न कॉलेज,शिवाजीनगर पुणे-05 यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्या सय्युक्त विद्यमानाने दुर्गंसवर्धन सोहळा आयोजित करण्यात आला होता. डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.छत्रपती शिवाजी महाराज की जय असे नुसते म्हणून आपले काम होणारे नाहीये. तर आपण स्वतः इतिहास आणि आपली संस्कृति जतन करण्यासाठी झटले पाहिजे. हे गड किल्ले महाराजांचे मूर्तिमंत असे जीवंत साक्षीदार आहेत. हजारो वर्षे हे सह्याद्रीचे कडे ऊन वारा पाऊस आणि काळाचे आघात आपल्या छातीवर मोठ्या डौलाने झेलत आहेत. काळाच्या ओघाने आणि मानवी हस्तक्षेपाणे यांचे नुकसान होत आहे, तरी आपण सगळ्यांनी गड किल्ल्यांच्या डागडुजी साठी सरकार वर अवलंबून न राहता या आपल्या हत्तींचे बळ असलेल्या मनगटांवर विश्वास ठेवावा! आता आपल्यालाच आपली मान, शान आणि आपला जाज्वल इतिहास जपावा लागणार आहे. उपस्थित युवशक्तीने डॉ.अमोल कोल्हे यांचे आव्हान स्वीकारले आणि आम्ही पण तुमच्या खांद्याला खांदा लाऊन या दुर्गंसंवर्धंनाच्या दैवी कार्यात योगदान देऊ अशी शपथ घेतली. एक खात्री देतो की काही अंशाने का होईनात दुर्गसंवर्धन आणि हिंदुराष्ट्राच्या जडण-घडणीत सुधारणा करण्यासाठी आज सेवा संघाने एक विधायक कार्य केले आहे. हे दैवी कार्य शेवट पर्यन्त असेच या खांद्यांवर समर्थ पणे पेलण्यासाठी आई भवानी चरणी प्रार्थना करतो....!!
मोडर्न महाविद्यालयात अमोलजी कोल्हें यांच्या प्रबोधनाला लाभलेला तारुण्याचा प्रतीसाद.

श्री शिवस्वराज्य सेवा संघाचे सदस्य व कार्यवाहक चि.सुजित चंद्रकांत नवले यांनी महाविद्यालयात व ईतरेतर केलेले काम सांगताना अमोलजी

तरुणाईला संबोधित करताना अमोलजी !

दुर्गसंवर्धनाला तरुणाईची गरज आहे, आम्हाला फक्त संदेश द्या आम्ही तुम्हास संपर्क करु.